आयुध निर्माणी भुसावळ प्रशासनाकडून गरजू विद्यार्थ्यांना दिवाळी भेट
भुसावळ : आयुध निर्माणी भुसावळ प्रशासनाकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त महाप्रबंधक वसंत निमजे यांच्याहस्ते कपडे, बूट, मोजे, फेस मास्क व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर महाप्रबंधक राजीव कुमार उपस्थित होते. महिला कल्याण समिती शाखाध्यक्षा वैजंती निमजे यांच्या अध्यक्षतेखाली इस्टेट परीसरामध्ये पहिल्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत च्या गरीब गरजू मुलांना विनामूल्य शिकवणी वर्ग ज्ञानज्योती या नावाने चालवले जातात. मुलांना दर गुरुवारी पोषक आहार फळे दिले जातात. या शिकवणी वर्गासाठी कंडारी परिसर इस्टेटमधील आउट हाऊस मध्ये राहणार्या परीवारातील मुले-मुली मोठ्या प्रमाणात य शिकवणी वर्गाचा लाभ घेतात. महाप्रबंधक वसंत निमजे यांनी ज्ञानज्योती शिकवणी वर्गातल्या मुला मुलींना दिवाळीची अनमोल भेट दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.
