बोदवड येथे ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा


कुर्‍हा : जवळच असलेल्या बोदवड गावात आमदार आपल्या दारी कार्यक्रम राबवण्यात आला. गावातील ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. कुर्‍हा परीसरातील शिवसेना व युवासेना यांच्या वतीने वढोदा गावात आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गेल्या 30 वर्षांपासून गावाचा विकास झाला नसल्याचे सांगत रस्ते, गटारी पिण्याच्या पाण्याची समस्या, विजेची समस्या, आरोग्याचा प्रश्न, शेतीचे रस्ते आदी समस्या मांडल्या. गावातील मुलींनी कुर्‍हा येथे शाळेत जाण्यासाठी फाट्यापर्यंत पायदळ जावे लागत असल्याने बस सुरू करण्याची मागणी केली.

दिवाळीनंतर बस होणार सुरू
आमदारांनी मुक्ताईनगर आगार व्यवस्थापकांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर दिवाळी सुट्या संपल्यानंतर बस सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी मिटींग हॉल बांधून देण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना ग्रुपपंचायतीचा ठराव घेऊन जि.प.बांधकाम विभागाचे भंगाळे यांनी काम करून देण्याच्या सूचना देण्ययात आल्या. शेतकर्‍यांनी शेत रस्त्यांची मागणी केली. तहसीलदार श्वेता संचेती यांना सांगून पालकमंत्री पाणंद रस्ते अंतर्गत काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या.




यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी नागतीलक, विस्तार अधिकारी जैन, जि.प.उपविभागीय अभियंता भंगाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अमित घडेकर, कुर्‍हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.तोडस्म, वीज कंपनीचे उपअभियंता खैरे, ग्रामपंचायत सरपंच शालू कमलाकर तायडे, उपसरपंच पावन कोगळे, शिवसेना शाखाप्रमुख लहु घूळे, दिलीप एकनाथ कांडेलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवाजी पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा, दीपक पवार, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख दीपक वाघ, कुर्‍हा शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव, बाळासाहेब पाटील, युवा सेना उप जिल्हाप्रमुख सतीश नागरे, नारायण पाटील, अमोल पाटील, संजय मुरलीधर पाटील, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नितीन कासार, पंकज धाबे, राहुल खिराळकर, रीतेश मुळंतकर, जयेश वाघ, शैलेश पाटील, शेख राहिस, योगेश मुळक, दयाराम पाटील, काशीनाथ वानखेडे, कुर्बान तडवी, अण्णा पवार, इम्रान भाई, अकबर ठेकेदार, फारूक भाई, आत्माराम पाटील, दिलीप कांडेलकर, वामन पाटील, सुधाकर पाटील, संतोष कांडेलकर, विष्णू पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, अशोक न्हावकर, नीना न्हावकर, गौतम सावळे, योगेश न्हावकर तसेच बोदवड येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !