दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाताना काळजी घ्या : सहा.निरीक्षक देविदास इंगोले


सावदा : दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाताना नागरीकांनी घरातील मौल्यवान दागिने व रोकड बँकेत ठेवावी व पोलीस ठाण्याला सूचित करावे, असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी केले. सध्या दिवाळी सण आल्याने नागरीक बाहेर गावी जातात तसेच लग्नासाठी बाहेर जात असल्याने घरातील मौल्यवान दागिने, जास्तीची रोकड बँकेत ठेवावी अथवा सोबत न्यावी, बाहेरगावी जात असल्यास शेजारी व पोलिसांना माहिती द्यावी तसेच व्यापारी, दुकानदार, सराफा व्यापारी यांनी याकाळात त्यामुळे रात्री सुरक्षा रक्षक ठेवावेत, सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावावेत व प्रवासात कुणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ किंवा पिऊ नये, प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे, गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये चढताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे, गावासह परीसरात संशयास्पद व्यक्त वाटल्यास वा हालचाल दिसल्यास त्वरीत पोलिसात संपर्क साधावा, असे आवाहन इंगोले यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !