भुसावळात विठ्ठल मंदिर वॉर्ड मित्र मंडळातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम


भुसावळ : शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड मित्र मंडळातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यात आली. या अभियानांतर्गत 157 नागरीकांनी लस घेतली. या प्रसंगी संयोजक शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, आयोजन समिती सदस्य गजू भारंबे, संतोष फालक, हर्षल नेमाडे, धनंजय फालक, कुशल राणे, भावेश फालक, चंद्रेश पाटील, गणेश नेमाडे, मिलिंद महाजन, रीतेश नेमाडे, रोहित चव्हाण, तोषल चौधरी, सौरभ चौव्हाण, भावेश इंगळे उपस्थित होते. या अभियानाला आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी, मोहन फालक, बाबू फालक, जीवन अहिरे, सोनी ठाकूर यांनीही भेट दिली. नगरपालिका आरोग्य प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !