चाळीसगावात कापड दुकान फोडून एक लाखाची रोकड लांबविली


व्यापार्‍यांमध्ये पसरली भीती : रात्रीची गस्त वाढवण्याची अपेक्षा

चाळीसगाव : शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 1 लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यापार्‍यांमध्ये पसरली भीती
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ जय शंकर रेडीमेड हे कापड दुकान आहे. या दुकानात ठेवलेले 1 लाख रुपये रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीला आली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान ही, घटना शनिवारच्या रात्री 10 वाजेपासून तर रविवार रोजी सकाळी 9.30 वाजेदरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. राजेंद्र शंकरराव वाघ (रा. शनिमंदिर चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा.निरीक्षक विशाल टकले करीत आहे.







भुसावळात बायोडिझेलची अवैध विक्री : आठ लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !