भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण
कर्तव्यदक्ष नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नांना आले यश : नागरीकांनी मानले आभार
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व समाजसेवक सतीश सपकाळे यांच्या प्रयत्नाने अयोध्या नगर परीसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. कामाचा शुभारंभ नुकताच प्रभागतील नागरीक यांच्यासह नगरसेविका अनिता सपकाळे व सतीश सपकाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक निधीतून ही कामे केली जात आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर रस्त्यांची दुर्दशा थांबल्याने नागरीकांनी सपकाळे दाम्पत्याचे आभार मानले आहेत. यापूर्वीदेखील सपकाळे दाम्पत्याने विविध सामाजिक कार्यातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.



रस्त्यांमुळे नागरीकांना मोठा दिलासा
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह प्रभागातील नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र सपकाळे दाम्पत्याने या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर आमदारांच्या स्थानिक निधीतून कामांना सुरूवा करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कामाच्या शुभारंभप्रसंगी सतीश ईश्वर सपकाळे, विशाल सतीश जंगले, राजू पाटील, अमोल तायडे, प्रकाश भोळे, आशाबाई विकास ठाकरे, फरीदाबाई तडवी, सोनू देशमुख, भाऊ तावडे, कैलास तावडे, किशोर बर्हाटे, भगवान तावडे, गायत्री सपकाळे, रवींद्र खरे आदींची उपस्थिती होती.

