भुसावळातील फालक नगरातील रस्त्यांनी टाकली कात


आवटे कुटुंबियांच्या पुढाकाराने कामांना सुरूवात : प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलणार : मंगला आवटे

भुसावळ : भुसावळातील फालक नगरात रस्ते डांबरीकरण कामाला सुरूवात झाल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. वसुबारसच्या मुहूर्तावर कामांना सुरूवात करण्यात आली. यापूर्वी डब्ल्यूबीएम रस्त्यांचे उद्घाटन आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते करण्यात आले होते. त्यानंतर डांबरीकरण कामाला सुरूवात करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रभागाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्र दत्तू आवटे यांच्या पाठपुराव्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आली. नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेविका मंगला संजय आवटे, विरूभाई चांडाले, सुलेमान तडवी,
गौरव राजेंद्र आवटे, घनश्याम मिश्रा, राजेश चंदन, विकास धारबडे, वेद ओझा, वसंत गोसावी, मुकेश बथेल, अमन तडवी, बी.एम.कच्छप, मंदार बनसोडे, मनोज पंडित, पणालाल यादव, दीपक गव्हाळे, विकी मेढे, जावेद तडवी, शुभम अहिरे, किशोर टोके अंकुश वावरे, लाजरस मनी आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !