जळगावातील घटना : पत्नीच्या मृत्यूची वार्ता कळताच पतीनेही घेतला गळफास
जळगाव : पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची वार्ता कळताच पतीनेही राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रामेश्वर कॉलनीत सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अरुण खंडू सोनवणे (47, रा.लाडली, ता. धरणगाव, ह.मु.नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
पत्नीच्या मृत्यूचा आघात सहन झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा
समजलेल्या माहितीनुसार, अरुण सोनवणे हे पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहतात. ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता. रविवार, 31 नोव्हेंबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यावेळी अरूण सोनवणे हे जळगावात राहत्या घरी एकटेच होते. सोमवारी सकाळी मीराबाई सोनवणे यांचा मृतदेह मुंबईहून येत असल्याने अरुण सोनवणे यांचे लहान भाऊ सुनील सोनवणे हे घरात आवरा-सावर करण्यासाठी सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अरुण सोनवणे यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा घरात दरवाजा आतून बंद होता. सुनील यांनी घरात दरवाजा तोडला असता मोठा भाऊ अरुण सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. दरम्यान, पत्नी मिराबाई सोनवणे यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर त्यांनी धसका घेवून राहत्या घरात गळफास घेतल्याचे बोलले जात आहे.








एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भाऊ सुनील सोनवणे व इतरांनी तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अरुण सोनवणे यांना हलवले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मयत अरुण सोनवणे यांच्या पश्चात आई सरूबाई, वडील खंडू सोनवणे, तीन भाऊ, सपना आणि अर्चना दोन विवाहित मुली आणि मुलगा अनिकेत असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली.