भुसावळात नेत्र व दंत तपासणी शिबिर


भुसावळ : भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ, जळगावमार्फत मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर यश हॉस्पिटलमध्ये झाले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.महेंद्र चौधरी आणि दंत चिकित्सक डॉ.लीना चौधरी यांनी आलेल्या सर्व रुग्णांची नेत्र आणि दंत तपासणी केली. डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.महेंद्र चौधरी यांनी केले. मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिरासाठी जिल्ह्यातील 129 शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबीयांसह लाभ घेतला. शिक्षक नाना पाटील यांनी अडूळसा रोप भेट दिले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना बोरोले, सचिव विक्रांत चौधरी, विनय भोगे, योगेश इंगळे, कुंदन वायकोळे, गिरीश महाजन, हेमंत धांडे, मिलिंद पाटील, संजु भटकर, हरीष बोंडे, विजय कोल्हे, अजय फेगडे, धनराज नेहते, प्रदीप सोनवणे, दीपक टोके, तुषार भोळे, तेजेंद्र महाजन, कैलास तायडे, नीलेश पाटील, समाधान जाधव, नाना पाटील, अमित चौधरी, राकेश कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, भाग्यश्री बोरोले, रुपाली भोळे, खुशाल महाजन, सुधीर तायडे, विजय चौधरी, शीतल चौधरी, आनंदा सपकाळे, नितीन राणे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !