वरणगावातील हनुमान नगरातील अभ्यासिकेत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
वरणगाव शहरात शिवसेनेचे मुख्याधिकार्यांना निवेदन
वरणगाव : शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील हनुमान नगरात तयार करण्यात आलेल्या अभ्याससिकेत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी व तेथे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक वातावरण तयार व्हावे व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिवसेनेतर्फे नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.
निकृष्ट कामाची व्हावी चौकशी
निवेदनाचा आशय असा की, वरणगाव नगरपरीषदेद्वारा निर्मित प्रभाग क्रमांक 10 मधील हनुमान नगर येथील मोकळ्या जागेतील अभ्यासिकेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून एका वर्षाच्या आत इमारत गळती सुरू झाली आहे तसेच इमारतीचा दरवाजा अतिशय तकलादू असून एक लाथ मारल्यास त्याचे तुकडे तुकडे होतील. ईमारतीवर जाण्यासाठी जिन्याला गेटची आवश्यकता होती ते बसवण्यात आले नाही. येथे संडास बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था नाही, अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था नाही, इमारतीच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रकारे गवत उगवले आहे त्याची साफसफाई न झाल्याने साप-विंचू यांचा नित्यवावर असल्याने, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या अभ्यासासाठी पुस्तके वाचनासाठी आवश्यक साहित्य पुरेशी वर्तमानपत्रे व इतर आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून सोयी-सुविधा पुरवाव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.



यांची होती पस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पीभाई, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, संतोष माळी, अतुल पाटील, राहुल बावणे, विनोद सुरवाडे, ललित जावळे, योगेश कोळी यांच्यासह शिवसैनिक व सदर अभ्यासिकेत अभ्यास करणारे निखील चौधरी, मंगेश चव्हाण, प्रतीक मराठे, शुभम घुले, आकाश केली, राहुल भोई, कुंदन धनगर, निलेश धनगर, विकास भाई, शुभम धनगर, विजू वंजारी, रोशन वंजारी, विकी चौधरी, तुषार वाघे, पवन चौधरी, पुष्पक माळी, जयेश कापडे, ज्ञानेश्वर हरदे, स्वप्नील देवघाटोळे, अविनाश जाधव, शुभम माळी, सचिन धनगर, अक्षय भुजडे, कुणाल सुरवाडे, अजय सुरवाडे, चिराग पाटील, अजय पालीमकर, भूषण माळी, चंदन गुंजकर, महेंद्र बुनकर, किरण माळी, मुकेश राजपूत, राहुल चौधरी, सुरज बावणे, विजय वानखेडे, राज वंजारी, सागर धनगर, पिल्लू भाऊ, दिनेश भाई, भैया मराठे, निखील हजबन यांच्यासह अभ्यासिकेत अभ्यास करणारे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
