सावंतवाडी हादरली : प्रॉपर्टी वादातून दोघा महिलांचा निर्घृण खून
सावंतवाडी : दोन वृद्ध महिलांची राहत्या घरात धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याची घटना सावंतवाडीत घडली. मालमत्ता वादातून ही घडले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रॉपर्टीची मालकीण नीलिमा नारायण खानविलकर (80) व तिच्या देखरेखीत साठी असलेल्या शालिनी शांताराम सावंत (77) अशी मयतांची नावे आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व अधिकार्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.
एकट्याच राहत होत्या मयत
सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील घाडगे निवास स्थानाच्या समोर खानविलकर कुटुंब असून या घरात नीलिमा खानविलकर या वृध्द महिला एकट्याच राहत होत्या.त्याचा भाचा हा मुंबई येथे असतो त्यामुळे त्याचे मित्र राजू मसुरकर यांनी सावंतवाडीतील एक फूले विक्री करणारी महिला शालिनी सावंत यांना न्यायालयात वृध्द महिले सोबत देखरेखी साठी ठेवण्यात आले होते. या दोघांना जेवणाचे डबे ही बाहेरून दिले जात होते.देखरेखीसाठी असलेल्या महिलेला डबा तिचा मुलगा देत असे तर घरांची मालकीण निलिमा खानविलकर हिला डबा बाहेरून आणून दिला जात असे. शनिवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे हा डबा आणून देण्यात आला होता. देखरेखीसाठी असलेल्या महिलेला तिचा मुलांने सांयकाळी साडेसात सुमारास जेवणाचा डबा आणून दिला. दोघींनी ही जेवण केले नव्हते.


दोघे आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात
रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी खानविलकर या वृध्द असल्याने त्याना हाक मारण्यासाठी गेले असता त्याना दोन्ही वृध्द महिला जेवण खोलीत रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या दिसल्या त्यामुळे मसूरकर हे चांगलेच चक्रावून गेले त्यांनी लागलीच पोलिसांना तसेच आजू बाजूच्या लोकांना यांची माहीती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व वस्तूस्थीती जाणून घेतली दोन्ही वृध्द महिलांना क्रुरतेने मारले असून तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला आहे. दोघाही वृध्दाचा डोक्यावर तसेच हातावर मानेवर मोठे वार करण्यात आले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मते मारेकरी हा ओळखीचा असावा त्याच्या साठी गॅसवर जेवण ही केले होतेपण तो जेवला नाही असा पोलिसांना संशय आहे. या दोन्ही वृध्दाच्या गळ्यात सोन्याच्या चेन होत्या मात्र या चेन तशाच असल्याने चारीच्या उद्देशाने हे कृत्य झालेले नाही. मालमत्ता वादातून हे खून झाल्याचा संशय आहे.