मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हजार कोटी संपत्तीची जप्तीची नोटीस


मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला असतानाच मंगळवारी सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रीअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.

या संपत्तीबाबत वाढल्या अडचणी
जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री
बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी



साऊथ दिल्लीमधील फ्लॅट
बाजार मूल्य : सुमारे 20 कोटी

पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस
बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी

निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट
बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी

महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन
बाजार मूल्य : सुमारे 500 कोटी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !