जळगावात भाजपाचा मोर्चा : माजी मंत्री गिरीश महाजनांसह पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा


जळगाव : जनआक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 10 जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी भाजपातर्फे कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जमाबवंदी आदेशाचे उल्लंघण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी मोर्चा
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण 7 ते 8 हजार लोकांचा जमाव जमला होता. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण झाले. याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे राकेश दुसाणेे यांनी फिर्याद दिली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !