किनगावच्या इसमाची आजाराला कंटाळून आत्महत्या


यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथील रहिवासी असलेल्या इसमाने जळगावात वाल्मीक नगरातील त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. राजू संपत सुरवाडे (57) असे मयताचे नाव आहे. राजू सुरवाडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, दोन लहान भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे. ते फैजपूर येथील डी.एस.सुरवाडे यांचे मोठे बंधू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !