शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे भुसावळांत गुणवंतांचा गौरव
भुसावळ : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे भुसावळात गुणवंतांचा गौरव समारंभ नुकताच शहरातील यजुर्वेद भवनात झाला. अध्यक्षस्थानी गजानन जोशी होते. लोकसंघर्ष आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त सुनील पी.पाठक यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत जोशी यांनी ‘कोरोना बंदी नव्हे एक संधी’ या पुस्तकाचे स्वतः लेखन करून प्रकाशन केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या गुणवंतांचा झाला गौरव
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यात अनिकेत महेश व्यवहारे, प्रणाली संदीप कुलकर्णी, आदित्य हेमंत भोकरडोळे, श्रृती पंकज मोतीवाले, गायत्री प्रसाद पुराणिक, ईशा मनोज जोशी, शुभम शिरीष पाठक, रसिका देवेंद्र जोशी यांचा समावेश आहे. उच्च माध्यमिक परीक्षेतील अभिषेक श्रीकांत गिरणीकर, प्रवीण जोशी, श्रृती श्रीकांत कुलकर्णी, मानसी गजेंद्र कुलकणख, जानवी राकेश कुलकर्णी, गजानन जोशी, गौरव राजेंद्र जोशी, पार्थ राजीव पाठक, अंकुश अनंत जोशी, तन्मय श्रीकांत जोशी, चिन्मय संजय जोशी, मानसी सुनील कुलकर्णी, प्रसाद दिलीप कंक, प्राची आमोद टेंभुर्णीकर यांचा गौरव करण्यात आला.



यांची कार्यक्रमास उपस्थिती
अंबाडे यांनी मुलांना कसून अभ्यास करण्याचे आवाहन केले. पुराणिक यांनी स्पर्धा परीक्षा तसेच अनेक स्पर्धांचे विवेचन केले. पाठक यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत जोशी यांनी विद्यार्थ्यांनी सदैव परीक्षेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. संस्थेचे सचिव हेमंत जोशी यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराची माहिती दिली. गजानन जोशी यांनी मुलांनी जास्तीत जास्त यश संपादन करण्याचे आवाहन केले. अनिल हिंगवे यांनी सूत्रसंचालन केले. शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाचे सचिव हेमंत जोशी आणि सहसचिव अॅड.चित्रा आचार्य, अॅड.मंजुषा कुळकर्णी, अविनाश पाठक, रामचंद्र गचके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
