प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयात दीपोत्सव उत्साहात


भुसावळ : यावल रोडवरील प्रजापिता ब्रम्हकुमारि ईश्वरीय विश्वविद्यालयात गुरुवारी दिवाळी निमित्ताने दीपोत्सव सकाळी 7 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रप्रमुख सिंधू दीदी यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देउन दिवाळीचे अर्थात दीपोत्सवचे आध्यात्मिक महत्व सांगितले. या उत्सवाने प्रत्येक कुटुंबात चैतन्य निर्माण होते. या सणात आध्यात्मिक पर्वणी लाभते, प्रत्येक व्यवसायाला चालना मिळते. दिवाळीला आपल्यातील काम, क्रोध, मोह आणि वासना नष्ट करुन आत्म प्रकाशमय व्हावे असे मार्गदर्शन केले. यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री गणेश , महालक्ष्मी , सरस्वती यांची सजीव आरास करण्यात आली. यात चंदनकुमार यांनी श्री गणेश, सरस्वतीची भूमिका श्वेता यांनी तर लक्ष्मीची भूमिका डिंपल यांनी साकारली.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
याप्रसंगी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात करण, नम्रता, श्रेया व श्रृती यांनी दीपावली गीते आणि नृत्य सादर केले. सूत्रसंचालन दीपा उर्फ गुड्डी दीदी व ज्योती दीदी यांनी केले. यशस्वीतेसाठी भरतभाई, नितीन भाई, अनिल भाई, दिलीप भाई, कुकरेजा भाई, पंडित भाई यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !