भुसावळात दिवाळीनिमित्त बालाजी मंदिरात भजन
भुसावळ : शहरातील राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे दिवाळीनिमित्त गुरुवारी पहाटे शहरातील श्री लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरात भजनाचा कार्यक्रम प्रभात फेरीदरम्यान पार पडला. यावेळी भक्तीगीत व भजन समाजबांधवांनी गायले. यावेळी राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, जी.आर.ठाकूर, ईश्वरबाबू पटेल, लालजी पटेल, मोहन भराडे, डॉ.देवेंद्र शर्मा, राजीव पारीख, गोविंद हेडा, गोटू लाहोटी, मदन बोरकर, अर्जुन पटेल, श्याम काबरा, प्रेम लढ्ढा, विसपुते, मनोज दरगड, विजू काबरा, पिंटू हेडा, राज भराडे, डॉ.साधना शर्मा, शशीकला लाहोटी, विणा लाहोटी, कल्याणी जोशी, निशा शर्मा, श्यामलता लढ्ढा, विमल काबरा, शकुंतला हेडा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
