वाकडी येथील महिलेचा विनयभंग ; दोघांविरोधात गुन्हा


पहूर : जामनेर तालुक्यातील वाकडी येथील महिला शेतात काम करत असतांना शेताच्या वादातून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेताच्या वादातून विनयभंगाचा आरोप
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी त्या पती व मुलासह वाकडी शिवारातील शेतात कपाशी वेचण्याचे काम करत असतांना संशयीत आरोपी वसीम शहर सिकंदर शहा (35, रा.वाकडी) आणि शेरू शहा दिल शहा (32, रा.खामगाव, जि.बुलढाणा) हे शेतात येवून ही शेती आमची आहे, शेतातून निघून जा असे सांगून महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला तर महिलेचे पती आणि मुलाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार प्रवीण चौधरी करीत आहे.









 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !