भुसावळातील समाजसेवक सारंगधर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : शहरातील समाजसेवक तथा हॉटेल न्यू पंजाब खालसाचे संचालक सारंगधर पाटील उर्फ छोटूभाऊ पाटील यांचा रविवार, 7 रोजी वाढदिवस असल्याने दिवसभर हितचिंतक, मित्र परीवार व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छा देत सारंगधर पाटील यांच्या दीर्घायुष्याची कामना केली.
दिवसभर स्नेहीजनांचा शुभेच्छांचा वर्षाव
सारंगधर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक संतोष बारसे, संजय आवटे, गर्व्ह.कंत्राटदार गौरव राजेंद्र आवटे, धुमाळ काका, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ, गब्बर चावरीया, रवींद्र लेकुरवाळे, प्रहारचे युवा शहराध्यक्ष सनी गोणे, गुरू भाई यांच्यासह मित्र परीवार व स्नेहीजनांनी सारंगधर पाटील यांची भेट घेत केक कापून व पुष्पगुच्छ देवून समाजकार्यासाठी दीर्घायुष्य लाभण्यासह पुढील जीवन सुखी, समृद्ध व भरभराटीचे जावो, अशी सदिच्छा यावेळी केली.



