यावलमध्ये मनसेचा एस.टी.संपाला पाठिंबा


यावल : राज्य परीवहन मंडळाच्या एस.टी.कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी एस.टी.कर्मचार्‍यांची भेट घेवून पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.

राज ठाकरेंच्या आदेशाने पाठिंबा
राज्य परीवहन मंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे, एस.टी.ची करार पध्दत रद्द करावी, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे एस.टी.कार्मचार्‍यांना वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व एस.टी. कर्मचार्‍यांनी रविवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारपासून अचानक बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये यावल आगारातील एस.टी.कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाला मनसेने पाठिंबा दिला आहे. शासनाने एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करावे, अशी देखील मागणी करण्यात आली. निवेदनावर मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपसंघटक विकास पाथरे, शहराध्यक्ष किशोन नन्नवरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष गौरव कोळी, विद्यार्थी सेनेचे विपूल येवले, शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !