भुसावळात प्रभाग सातमधील रस्त्यांचे 25 वर्षांनी उजळले भाग्य


भुसावळ : समाजसेवक तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक मुकेश पाटील यांच्या प्रयत्नाने शहरातील प्रभाग सातमधील गणेश कॉलनी व अंतर्गत रस्त्यांचे भाग्य तब्बल 25 वर्षांनी उजळल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. खडतर व चालण्यायोग्य नसलेल्या तब्बल 550 ब्रॉसच्या या रस्त्यांचे नगरसेवक मुकेश पाटील यांच्या पाठपुराव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले असून यापूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम 1996 मध्ये करण्यात आले होते.

पाठपुराव्यानंतर पूर्ण झाले काम
शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील गणेश कॉलनी व अंतर्गत रस्ते अखेरची घटका मोजत होते. ओबडधोबड रस्त्यांवरुन चालणेही कठीण झाले होते. यामुळे परीसरातील नारीकांची अडचण वाढली होती. या प्रश्नी नगरसेवक मुकेश पाटील यांनी पुढाकार घेतला. पालिकेकडे पाठपुरावा करून त्यांनी गणेश कॉलनीतील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केल्याने या परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !