श्री क्षेत्र मनुदेवी येथे पूजा साहित्यासह खेळण्यांची चोरी


व्यावसायीकांमध्ये पसरली भीती : चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा

यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परीरात असलेल्या पुजा साहित्यासह खेळणी विक्रेत्यांच्या दुकानातील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यावल पोलिसात या बाबत तक्रार देण्यात आली आहे. सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परीसरात पूजा साहित्यासह खेळणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांची दुकाने आहे. सोमवारी ही दुकाने बंद करून व्यावसायीक घरी निघून गेले होते व मंगळवारी सकाळी जेव्हा ते मंदिर परीसरात पोहचले तेव्हा यातील अनेकांच्या दुकानातील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे निर्दशनास आले. नारायण पंडित पाटील यांच्या दुकानातील सुमारे 70 हजारांचे साहित्य चोरीस गेले तर अनेक दुकानदारांचे प्रचंड नुकसान अज्ञात चोरट्यांनी केल्याचे उघडकीस आले. प्रथमच असा प्रकार घडल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !