खामखेड्यात फटाके फोडल्यामुळे : दोन गटात हाणामारी


मुक्ताईनगर : येथूनच जवळ असलेल्या खामखेडा येथे घरासमोर फटाके फोडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाळीच्या दिवशी फिर्यादी देवानंद अटकाडे यांच्या घरासमोर सुनील शिरसोडे यांनी फटाके फोडल्याने गुरुवार, 4 रोजी दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पडसाद मंगळवार, 9 रोजी उमटले. त्यात फिर्यादी देवानंद अटकाडे यांच्या आई पंचफुलाबाई अटकाडे यांना सुनील शिरसोडे, रवींद्र शिरसोडे, आदर्श शिरसोडे यांनी मारहाण केली. पंचफुलाबाई अटकाडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून सुनील शिरसोडे, आदर्श शिरसोडे, रवींद्र शिरसोडे यांच्यासह आठ जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !