भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा 13 रोजी वधू-वर परीचय मेळावा


भुसावळ : भुसावळ हातमाग विणकर कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने लिंगायत कोष्टी समाजाचा व्दितीय वधू-वर परीचय मेळावा शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयात होणार आहे. अध्यक्षस्थानी नानासाहेब घोडके असतील. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सोयरीक परीचय पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पा म्हसकर, अंजली बन्नापुरे, संजय लवणे, नारायणराव वड्डे, अशोक वाळवेकर उपस्थित राहतील. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दीपक विनंते, राजेश कोष्टी, मुकेश कोष्टी, दीपक कोष्टी, विनय कोष्टी, सतीश घोडके आदी परीरश्रम घेत आहेत. या मेळाव्याला उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माधव गरूडे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !