सूरपान शिवारातील कांदा चाळीतून चोरट्यांनी सव्वा लाखांचा कापूस लांबवला


साक्री : शेती साहित्याच्या चोर्‍यांमध्ये वाढ झाली असून तालुक्यातील सूरपान शिवारात एका कांदा चाळीत ठेवलेला एक लाख 23 हजार रुपये किमतीचा कापूस चोरट्याने लांबवल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्ह्याची दाखल करण्यात आला. सूरपान येथे जिभाऊ रामचंद्र चौधरी (71) यांची शेती असून शेतातच कांद्याची चाळ आहे. वेचून आणलेला कापूस तेथे प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला असता एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा कापूस चोरट्यांनी रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी पहाटे सहा वाजेदरम्यान चोरून नेण्यात आला. सकाळी जिभाऊ चौधरी हे चाळीत आले असता त्या ठिकाणी ठेवलेल्या कापसाच्या गोण्या त्यांना आढळून न आल्योन त्यांनी साक्री पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !