अल्पवयीन बालिकेवर वृद्धाने केला अत्याचार : आरोपीला अटक
धुळे : 71 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका भागात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. बकरीसाठी झाडाचा पाला तोडून देण्याच्या बहाण्याने 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका शिवारात नेल्यानंतर संशयीत आरोपी शांताराम शिवराम अहिरे (दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मोहाडी उपनगरातील वृध्दाला मोहाडी पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. दरम्यान, अत्याचाराची घटना मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी घडल्याचे सांगण्यात आले.

