मुक्ताईनगरातील शिवचरण उज्जैनकर माजी महसूलमंत्री खडसेंनी केला सन्मान


मुक्ताईनगर : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना गोवा येथील नोवोटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका शानदार कार्यक्रमात कॉमनवेल्थ ओकेशनल युनिव्हर्सिटी आफ्रिका किंग्डम ऑफ टोंगाने सन्मानीत करण्यात आले तसेच उज्जैनकर यांच्या 24 वर्षाच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना नुकतेच डिलीटने सन्मानीत करण्यात आल्याने माजी महसूल तथा कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उज्जैनकर यांचा शाल व बुके देऊन नुकताच सत्कार केला. याप्रसंगी त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सभापती राजूभाऊ माळी आदी उपस्थित होते. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी उज्जैनकर यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !