बेछूट आरोपांचा निषेध : जळगावात राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिकांचा पुतळा जाळला
जळगाव : महाविकास आघाडीचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्त्े नवाब मलिक यांनी भाजपा पदाधिकार्यांवर बेछुट आरोप चालवल्याच्या निषेधार्थ बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील शास्त्री टॉवर चौकात नवाब मलिक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलेने मारहाण करीत पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजप पदाधिकार्यांवर बिनबुडाचे आरोप
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक हे केवळ मिडिया समोर राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करीत असून स्वतः नगरमध्ये यांचे जावई हे ड्रग्ज प्रकरणांमध्ये अडकले आहे त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांना मंत्री मंडळातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी करून मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन खडके, व्यापारी आघाडीचे अशोक राठी, दिव्यांग आघाडीचे गणेश वाणी, कामगार आघाडीचे कुमार सिरामे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष गणेश महाजन, स्वामी पोतदार, विकी सोनार, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील, रेखाताई पाटील, तृप्ती पाटील, लता बाविस्कर, ज्योती निंभोरे, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, सुरेखा अमृतकर, नितू परदेशी, उषा पाठक, स्नेहा निंभोरे पुष्पेंद्र जोशी, हर्षल चौधरी, निखिल सूर्यवंशी, महेश राठी, आकाश चौधरी, भूषण आंबीकर, संतोष बाविस्कर, अश्फाक शेख, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका चिटणीस गिरीश वराडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वासुदेव कोळी, उपसरपंच कडगाव चेतन पाटील, माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे, तालुका सरचिटणीस ललित बर्हाटे, भुषण पाटील, तालुका सरचिटणीस सागर घुगे, पवन पाटील, प्रकाश पंडित,गणेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.