वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका : थोरगव्हाणचे सरपंच अपात्र
यावल : वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने थोरगव्हाण (ता.यावल) येथील लोकनियुक्त सरपंच उमेश देवराम सोनवणे यांना अपात्र करण्यात आले. ते अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध उपसरपंचासह एका व्यक्तीने जिल्हाधिकार्यांकडे गतवर्षी तक्रार केली होती. 28 फेब्रुवारी 2018 रोजी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर लोकनियुक्त सरपंच म्हणून उमेश सोनवणे हे विजयी झाले. यानंतर 15 सप्टेंबर 2020 रोजी उपसरपंच ज्योती केवल पाटील व पंडित आनंदा पाटील यांनी सरपंच सोनवणे यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे 8 वेळा सुनावणी झाली. 8 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकार्यांनी लोकनियुक्त सरपंच सोनवणे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 30-1 अ नुसार सरपंच म्हणून अपात्र घोषित केले.