जळगावात 30 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरातील 30 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री 8 वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल विठ्ठल हिरे (30, रा.हरी विठ्ठल नगर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

घरात कुणी नसताना आत्महत्या
शहरातील हरीविठ्ठल नगरातील अनिल हिरे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गुरूवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता घरात कुणीही नसतांना घर बंद करून त्यांनी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान पत्नी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पतीने आत्महत्या केल्याचे पाहून पत्नीने हंबरडा फोडला. शेजारील नागरीकांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास विजय खैरे करीत आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !