जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा


रावेर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठींबा दिल्याने रावेर तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबतची घोषणा शुक्रवारी राजीव रघुनाथ पाटील यांनी जळगावात पत्रकार परीषद घेऊन केली. यावेळी पाठिंब्याचे पत्र पाटील यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
रावेर येथे दोन दिवसांपूर्वी तालुका विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनीदेखील पाठिंबा दिल्याने तिरंगी लढतील दोन्ही काँग्रेस विचाराच्या उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सोपा झाल्याचे मानले जात आहे. तब्बल 12 वर्षानंतर पाटील यांचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून संचालक पदावर विराजमान होणार आहे. यावेळी जळगावात संजय पवार तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.

दोन्ही उमेदवारांचा अरुण पाटील यांना पाठिंबा
जिल्हा बँक निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. जनाबाई महाजन व राजीव रघुनाथ पाटील यांनी अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने रावेरात खळबळ उडाली आहे. जनाबाई महाजन यांनी पाठिंब्याचे पत्र अरुण पाटील यांच्याकडे त्यांचे पती गोंडू महाजन यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, नितीन पाटील , मंदार पाटील, सीताराम पाटील यावेळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !