भुसावळचे रणजितसिंग राजपूत यांचा गौरव

मेवाडचे राजकुमार महाराजा लक्ष्यराजसिंग मेवाड यांनी दिले निमंत्रण


भुसावळ : महाराणा प्रताप यांचे 34 वे वंशज व मेवाडचे राजकुमार महाराजा लक्ष्यराज सिंह मेवाड यांची भुसावळातील रणजीतसिंग राजपूत यांच्या जन्मदिवसानिमित्ताने मेवाडची राजधानी असलेल्या उदयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सिटी पॅलेस येथे विशेष शाही आमंत्रण देत राजपूत यांचा सन्मान सुद्धा केला. भारत सरकारच्या वतीने युवक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ कार्य करणार्‍या युवकाला दिला जाणारा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळाल्यानंतर समस्त राजपूत समाजाचा सन्मान वाढविल्याबद्दल मेवाडचे राजकुमार यांनी त्यांना स्वतःहून आमंत्रन देऊन सन्मानीत केले.

राजपूत समाजासाठी अभिमानास्पद बाब
महाराणा प्रताप यांचे वंशज असलेल्या मेवाडचे महाराजा लक्ष्यराज सिंह मेवाड यांनी त्यांच्या राजमहलात रणजीतसिंग राजपूत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना सन्मानीत केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की ,राजपूत समाजात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजासाठी कार्य करणार्‍या प्रत्येक युवक त्यांना आदर्श वाटतो. उदयपूरच्या शाही परीवाराद्वारे मिळालेले आमंत्रण हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराणा प्रताप यांना मी नेहमी आदर्श मानतो आणि प्रत्यक्ष त्यांचे 34 वे वंशज असलेले राजकुमार लक्ष्यराजसिंह मेवाड ह्यांचा आशिर्वाद प्राप्त झाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असे राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी रणजीतसिंग राजपूत यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !