भुसावळात स्व.डी.डी.शर्मा यांना अभिवादन


भुसावळ : शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंदी सेवा मंडळाचे माजी सचिव स्व.डी.डी.शर्मा (भैय्याजी) यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. हिंदी सेवा मंडळाच्या सचिव एम.डी.शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, बिशेनजी अग्रवाल, डॉ.रविकांत परदेशी, पंकज संड, संजय नाहाटा, गोपाल अग्रवाल, नंदलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ.राहुल बारजिभे मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे विभागप्रमुख, कर्मचारी व समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान स्व. भैय्याजींच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला. स्व.डी.डी.शर्मा (भैय्याजी) हे एक अफाट व्यक्तिमत्व होते. त्यांचे सामाजिकच नाही तर शैक्षणिक कार्यात सुद्धा प्रचंड योगदान असून भुसावळ शहरातील नागरी आणि शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी त्यांनी केलेले अतुलनीय काम आणि त्याग हे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभप्रमाणे मार्गदर्शक व आदर्श असल्याचे प्राचार्य डॉ.राहुल बारजिभे म्हणाले. सूत्रसंचालन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !