मुक्ताईनगर तालुक्यातील गुन्हेगारीवर अंकुश हवा : व्यापारी संघटनेची मागणी
मुक्ताईनगर : कुर्हा व्यापारी संघटनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देवून तालुक्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कुर्हा परीसरातील वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक राहुल खाताळ व आमदार चंद्रकांत पाटील यांना कुर्हा व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
गुन्हेगारीचा व्हावा बीमोड
कुर्हा परीसरात गेल्या काही वर्षभरापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गत आठवड्यात वढोदा-हलखेडा लुटमार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील यांचा मृत्यू ओढवला तर गत मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दिनेश जैस्वाल यांच्या अंबिका ट्रेडींगमधून 48 हजार तर सुमित चौधरी यांच्या कपाशीच्या दुकानातून सुमारे दीड लाख रुपये चोरीला गेले. गुन्हेगारीवर तातडीने अंकुश लावावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना कुर्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश दालमिया, उपाध्यक्ष नितीन कासार, कोषाध्यक्ष विनोद चौधरी, सुशील भुते, सदस्य दिनेश जैस्वाल, डॉ.बी.सी.महाजन, रामेश्वर चव्हाण, मुकेश मापारी, शेख मोहम्मद, पंकज पांडव, शिवसेना उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील, उपसरपंच कुर्हा पुंडलिक कपले, रवींद्र दांडगे, विलास चिंचोलकर आदी उपस्थित होते.


