अरे देवा ! भाऊच निघाला चोरटा : हरीपुर्‍यात बहिणीचे मंगळसूत्र लांबवले


यावल : तालुक्यातील हरीपुरा येथे महिलेच्या सख्ख्या भावानेच 15 हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र लांबवले. वारंवार मंगळसूत्र परत कर असे सांगूनही मंगळसुत्र परत न केल्याने येथील यावल पोलिसात राजेंद्र अहिरे या तरुणाने फिर्याद दिल्यानुसार त्याचा मामा राजू बारकू जोगी (रा.एकलग्न, ता.धरणगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जोगी हा हरीपुरा येथे 18 ऑक्टोबर रोजी आल्यानंतर त्याने बहिणीला तुझ्या पेटीतील वडिलांचा फोटो दाखव, असे सांगितले. पेटी उघडताच त्याने तीन ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र लंपास करीत पळ काढला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !