शिंदखेड्यात स्टेट बँकेचे एटीएम फोडले : 36 लाखांची रोकड लंपास

एटीएमची सुरक्षा वार्‍यावर : बँक प्रशासनाची बेफिफिरी उघड : चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध


शिंदखेडा : शहरातील येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी तब्बल 36 लाखांवर रक्कम लांबविल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला तर या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

एटीएम सुरक्षा वार्‍यावर : बँक अधिकार्‍यांची बेफिकीरीही उघड
शिंदखेडा शहरात शिरपूर रोड लगत स्टेट बँक आहे. बँकेला लागूनच बँकेचे एटीएम मशीन आहे. या मशीनमध्ये शुक्रवार, 12 रोजी 39 लाख रुपये भरण्यात आले मात्र ग्राहकांनी काही रक्कम काढल्यानंतर 36 लाख 86 हजार 500 रुपये मशीन मध्ये शिल्लक होते. अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन प्लेझर मशिनच्या साह्याने फोडून ही रक्कम लांबविली आहे.

तीन ते चार चोरटे असल्याचा अंदाज
एटीएम मशीनच्या आजूबाजूस बँकेचे तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. मात्र यातील एका कॅमेर्‍यावर चोरट्यांनी स्प्रे मारलेला आहे.
तर अन्य दोघे कॅमेर्‍यांची दिशा बदलून त्यांच्या वायरी तोडण्यात आल्या. याशिवाय बँकेसाठी असलेल्या अलार्म च्याही वायरी चोरट्यांनी तोडलेल्या आहे. आज दुपारी बारा वाजता बँकेचे उपव्यवस्थापक अविनाश पगारे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्वरित बँकेच्या वरीरष्ठ अधिकार्‍यांसह येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !