दोन हजारांची लाच घेताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात

दुय्यम कारागृहात स्वीकारली लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ


भुसावळ : दुय्यम कारागृहातील मुलाला भेटू देण्यासह त्यास घरचा डबा देण्यासह जळगाव कारागृहात हलवू न देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे (41, रा.शिंदखेडा, ता.धुळे) यास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुय्यम कारागृहातच हा सापळा पथकाने यशस्वी केला.

लाच स्वीकारताच केली अटक
48 वर्षीय महिला तक्रारदार यांच्या मुलास एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली असून तो भुसावळ दुय्यम कारागृहात आहे. मुलास जळगाव जिल्हा कारागृहात न पाठविण्यासाठी व जेलमध्ये त्याला घरचा जेवणाचा डबा देण्यासह भेटू देण्यासाठी व इतर सवलती देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक देवरे यांनी 10 नोव्हेंबर रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रादार महिलेने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महिलेकडून आरोपी देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यास पंचांसमक्ष अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाच मागितल्यास साधा संपर्क
कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. संपर्कासाठी जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार व दुरध्वनी क्रमांक 0257-2235477 तसेच मोबाईल 8766412529 तसेच टोल फ्रि कक्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे एसीबीतर्फे कळवण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !