भुसावळ शहरात 22 रोजी शरीरसौष्ठव स्पर्धा
भुसावळ : शहरातील समाज मंगल कार्यालयात व्हेन्स क्लासिक श्री 2021 जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन 22 नोव्हेबरला सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना एकूण एक लाख 75 हजार रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहे. किताब विजेत्यास रोख 21 हजार रुपये, मानाचा पट्टा, करंडक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे 1 ते 5 क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख 5001, 4001, 3001, 2001 व पाचव्या क्रमांकास रोख 1001 रूपयांचे बक्षिस देऊन सन्मानित केले जाणार आहे. बेस्ट पोझर पुरस्कार 5001 रूपये, करंडक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आहे. तर मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर पुरस्कार 3001 रूपये, करंडक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असा आहे. स्पर्धेत 55, 60, 65, 70, 75 किलो वजनी गटात स्पर्धक भाग घेतील. सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी, मोहन चव्हाण, जयेश संतोष चौधरी, अक्षय चव्हाण, राजेश बिर्हाडे, नाशिर शेख बागवान, राजेंद्र काळभोर, प्रशांत तायडे, डॉ. भूषण मगर पाटील, मनोहर चौधरी यांनी केले आहे. व्हेन्स फिटनेस जीमच्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळवण्यात आले आहे.


