पीक विम्याच्या लाभापासून वंचित नुकसानग्रस्तांना तत्काळ लाभ मिळावा

खासदार रक्षा खडसे यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील बैठकीत निर्देश


मुक्ताईनगर : जोरदार पाऊस व वादळामुळे जळगाव जिल्ह्यात झालेले शेती नुकसान तसेच 2020-21 या वर्षातील हवामानारील आधारीत फळ पीक विमा योजने अंतर्गत प्राप्त तक्रारींबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या जळगावातील कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. कृषी विभागातील अधिकारी, बँक अधिकारी व पीक विमा कंपनी अधिकारी यांना पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ लाभ द्यावा, असे निर्देश खासदारांनी यावेळी दिले.

नुकसानीनंतरही शेतकरी भरपाईपासून वंचित
जोरदार पाऊस व वादळामुळे जळगाव जिल्ह्यात केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामे झाले तसेच 2020-21 अंतर्गत पीक विमा उतरविलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना बजाज अलायन्झ इन्सुरन्स कंपनीद्वारे पीक विम्याचा लाभ देण्यात आला मात्र पीक विम्याच्या लाभास पात्र असून सुद्धा जिल्ह्यातील बर्‍याच शेतकर्‍यांना पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडे दररोज बर्‍याच शेतकर्‍यांच्या तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात सर्व शेतकर्‍यांची यादी घेऊन खासदार रक्षा खडसे यांनी पीक विमा संबंधित सर्व कृषी विभाग अधिकारी, बँक अधिकारी व पीक विमा कंपनी अधिकार्‍यांची जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात बैठक घेतली. शेतकर्‍यांना तातडीने भरपाईची रक्कम देण्याबाबत निर्देश देण्यात आले.



कार्यालयाबाबतही दिले निर्देश
2021-22 अंतर्गत हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेसाठी नव्याने नियुक्त केलेली अ‍ॅग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी (एआयसी) यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून भविष्यात शेतकर्‍यांना होणार्‍या अडचणी व शंका विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर पीक विमा कंपनीचे कार्यालय उघडण्याबाबत खासदारांनी निर्देश दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !