यावलला मतदार यादी विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर
यावल : आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आहे.
5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
आयोगाच्या आदेशान्वये 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 21-दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी तर शनिवार, 13 नोव्हेंबर तर रविवार, 14 नोव्हेंबर, शनिवार, 27 नोव्हेंबर), रविवार, 28 नोव्हेंबर या दिवशी विशेष मोहीम राबवण्यात येईल. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे तर 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 1 नोव्हेंबर ते 30 जानेवारी या दरम्यान 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे किंवा अधिक असे उमेदवार आपले नाव यादीत समाविष्ट करू शकतात. त्यासाठी नमूना क्रमांक 6- मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना 7, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक 8 मतदार यादीतील नोंदीच्या कपशिला मध्ये दुरुस्ती करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक 8 अ मतदार यादीतील नोंदीच्या स्थानांतर करण्यासाठी करावयाचा अर्ज या मतदार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे ही कामे करू शकतील, अशी माहिती महसुल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


