शिरपूर तालुक्यात अज्ञाताच्या गोळीबारात एक जण जखमी

महादेव दोंदवाडा येथे घटना : नेमक्या कारणांचा पोलिसांकडून शोध


शिरपूर तालुक्यात अज्ञाताच्या गोळीबारात एक जण जखमी

महादेव दोंदवाडा येथे घटना : नेमक्या कारणांचा पोलिसांकडून शोध

शिरपूर : तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात मंगळवारी सायंकाळी अचानक अज्ञाताकडून गोळीबार झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. किसन जामसिंग पावरा (35, रा.महादेव दोंदवाडा, ता.शिरपूर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार नेमका कुणी वा का केला? याचे कारण कळू शकले नाही. पोलिसांकडून या बाबीचा तपास सुरू आहे.

अचानक झाला गोळीबार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा येथील किसन जामसिंग पावरा (35) हा गाव शिवारातील स्वतःच्या शेताजवळ बकर्‍या चारत असतांना बुधवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अचानक याचेमागून मोठा आवाज झाल्याने व त्याच्या डाव्या पायाच्या मांडीच्यावर काहीतरी लागल्याने मोठी आरोळी मारत जमिनींवर खाली कोसळला. आरोळी ऐकून मुलगा सुभाष किसन पावरा, पत्नी कायाबाई किसन पावरा, चुलतभाऊ रणजीत डिगा पावरा जवळ आले असता त्यांना किसन पावरा हा रक्तबंबाळ स्थितीत आढळून आल्याने त्यास तत्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून रात्री आठ वाजेच्या सुमारास धुळे येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविले. दरम्यान, पावरा याच्यावर बुधवारी शस्रक्रिया करण्यात आल्याची व डाव्या पायावर मागील बाजुस काय लागले हे निश्चीत सांगू शकत नाही तसेच कोणी मारले हे सांगु शकत नसल्याचा जबाब किसन पावरा यांनी तालुका पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वार्डबॉयच्या खबरीवरून नोंद करण्यात आली. बुधवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरनार यांनी महादेव दोंदवाडा येथील घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अधिक तपास पीएसआय नरेंद्र खैरनार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !