भुसावळ पालिकेची सभा रखडली


भुसावळ : तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 16 जुलैला पालिकेची सर्वसाधारण सभा झाली होती. ही सभा होऊन आता चार महिने उलटले. तरीही सर्वसाधारण सभेची तयार नाही. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी सभा होणार किंवा नाही? असा प्रश्न नगरसेवकांमधूनच उपस्थित होत आहे. भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभा वेळेत होत नसल्याची बाब आता नवीन राहिली नाही. कोरोनाचे कारण सापडल्याने सभांना वारंवार उशीर झाला. अशा स्थितीत आठ महिन्यांनंतर 16 जुलैला पालिकेची ऑनलाइन सभा झाली होती. त्यात 317 विषयांना मंजुरी मिळाली मात्र पालिकेकडे निधी नसल्याने यातील 90 टक्के कामे रखडली आहे. या सभेला देखील चार महिने उलटले. त्यामुळे पुढील सभा होणे गरजेचे आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !