भुसावळात इंधन दरवाढीचा निषेध : गॅस सिलिंडरसह दुचाकीला केला पुष्पहार अर्पण
काँग्रेस अनु.जाती विभागाच्या अनोख्या आंदोलनात शहरात चर्चा
भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 18 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरातील प्रभाग नऊमधील रमाबाई आंबेडकर नगरात काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तू इत्यादींची झालेली भरमसाठ वाढ तसेच खाजगीकरण व शेतकर्यांच्या आत्महत्या याविषयी जनजागरण अभियान राबविण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घरगुती गॅसची हंडी व मोटरसायकल यांना पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रहिम कुरेशी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जवरे, उपाध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष सागर कुरेशी, ठेवीदार संघटनेचे नेते प्रवीण पाटील, दुर्गा सोनवणे, सपना पगारे, मालुबाई साळवे, सकुबाई सोनवणे, देवरे, बेबीबाई भालेराव, विमलबाई सपकाळे, गालफाडे तसेच महिला व युवा तरुण आदी उपस्थित होते.


