सावद्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम


सावदा : सावदा येथे आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
सावदा येथे आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. आयोगाच्या आदेशान्वये 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी असेल तर शनिवार, 13 नोव्हेंबर, रविवार, 14 नोव्हेंबर व शनिवार, 27 नोव्हेंबर, रविवार, 28 नोव्हेंबर रोजी या दिवशी विशेष मोहिम राबवण्यात येईल. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदान प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नवमतदारांना नावे समाविष्ट करता येणार
1 नोव्हेंबर ते 30 जानेवारी दरम्यान 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे किंवा अधिक असे उमेदवार आपले नाव यादीत समाविष्ट करु शकतात. त्यासाठी नमूना क्रमांक 6 मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना 7 मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक 8 मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी करावयाचा अर्ज, नमुना क्रमांक 8 अ मतदार यादीतील नोंदीच्या स्थानांतर करण्यासाठी करावयाचा अर्ज या मतदार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे ही कामे करता येतील. लोकशाहीच्या बळकट करणासाठी पात्र नागरीकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !