भुसावळातील ‘आदित्य सुपर मार्ट’ मध्ये विंटर ऑफर्सला सुरुवात
दैनंदिन आवश्यक वस्तूंवर मिळणार भरभरून सूट
भुसावळ : दिवाळीनिमित्त सर्वत्र वेगवेगळे ऑफर्स मिळत असतातच मात्र दिवाळी संपताच या ऑफर्स तत्क्षणी गायब होतात. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची मागणी ही कधीही न संपणारी असून यावर ग्राहकांना प्रत्येक वेळी नवनवीन ऑफर्स मिळाल्यास त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याची अनुभूती मिळते. ग्राहकांच्या उत्सवी आनंदात आणखीन भर घालायला शहरातील ‘आदित्य सुपर मार्ट’ मध्ये विंटर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. खास विंटरनिमित्त १६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत अनेक प्रोडक्ट्सवर भव्य सूट, निवडक प्रोडक्ट्सवर विशेष सूट, ठराविक रकमांच्या खरेदीवर फ्री गिफ्ट्स, सर्व एफ.एम.सी.जी. प्रोडक्ट्सवर ५ टक्के सूट, होम डिलिव्हरीची सुविधा, सारख्या अनेक ऑफर्स सध्या सुरु आहेत. याशिवाय फायद्याचा डेली-डोस देणारे मल्टिपल ऑफर्स देखील दररोज सुरु आहेत.
भुसावळकरांनी संधीचा जरूर लाभ घ्यावा
फालक ग्रुप संचालित ‘आदित्य सुपर मार्ट’ नवीनच भुसावळ शहराच्या सेवेत हजर झाले आहे. येथे दैनंदिन जीवनात लागणारे सर्व प्रोडक्ट्स जसे ग्रोसरी, टी-शर्ट, अंडर गारमेंट्स, क्रोकरी, प्लास्टिक वेअर, खेळणी, स्टेशनरी, पर्स, बॅग्स, कॉस्मेटिक्स, स्टील भांडी, बेडशीट, पिलो कव्हर, टॉवेल इ. वस्तूंच्या एक नाही अनेक व्हरायटीज मिळतात. शॉपिंगचा सुखद अनुभव देण्याकरिता आनंदमय वातावरण, विनम्र स्टाफ आहेतच. डिस्काऊंट ऑफर्सला सणासुदीच्या काळापर्यंत मर्यादित न ठेवता इतर वेळी सुद्धा भरभरून सूट व अनेक फायद्यांचा लाभ म्हणजे आता भुसावळकरांचा प्रत्येक दिवस आनंददायी होणार असून या विंटर ऑफर्सचा ग्राहकांनी परिपूर्ण लाभ घ्यावा, असे आदित्य सुपर मार्टच्या संचालिका शर्वरी फालक यांनी आवाहन केले आहे.


