स्वच्छ भारत अभियानात यावल नगर पालिकेचा बहुमान
यावल : स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत कचरा मुक्त शहर (ॠ.ऋ.उ.) या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी देशपातळीवर चौथा (4) गुणाक्रम प्राप्त करत नगरपरिषद यावल चा 20 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत, केंद्र शासनाच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव, दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते व भारत स्वच्छता अभीयांनाच्या सहसचिव रूपा मिश्रा यांचे उपस्थितीत दिल्ली येथील नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व पालिकेचे अभियंता योगेश मदणे यांना नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावल पालिकेचा चौथा क्रमांक
स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत कचरा मुक्त शहर म्हणून येथील पालिकेस चौथा क्रमांक मिळाला आहे. पालिकेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्र शासनाच्या शासनाच्या वतीने 20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे एका भव्य समारंभात येथील नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व पालिकेचे अभियंता योगेश मदने यांना शहरी व ग्रामीण आवास मंत्रालयाचे सचिव, दुर्गा शंकर मिश्रा यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित भव्य समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वांच्या सहकार्याने देशपातळीवर झळकले नाव : नगराध्यक्षा
या स्पर्धेत शहरातील भौतिक व कागदोपत्री स्तरातील कामकाजाची तपासणी व मूल्यांकन शासनाने नेमलेल्या त्रयस्थ समितीमार्फत झालेले होते. त्यानुसार देश पातळीवर यावल नगरपरिषदेने उत्तम कामगिरी केली होती. शहर स्वच्छतेबाबतचा केंद्र शासनाच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराने मला अत्यंत आनंद झाला असल्याचे सांगून या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय शहरवासीयांना तसेच नगरपरिषदेचे सफाई कामगार , व स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व मुख्याधिकारी , उपनगराध्यक्ष , व माझे सर्व सहकारी नगरसेवक बंधु भगीनीना देत असल्याचे सांगितले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज यावल शहराचे नाव देश पातळीवर झळकले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी दिली आहे.


