वरणगावातील संतोष माळींसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत शिवसेना भवनात खासदार संजय राऊत यांच्याहस्ते बांधले शिवबंधन


वरणगाव : शहरातील मुस्लिम समाजाचे नेते तथा भाजपचे सय्यद जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांच्यासह वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी (आपला माणुस) यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना भवनात शिवसेनेत प्रवेश केला. खासदार तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजयजी राऊत यांच्याहस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. या प्रसंगी उपनेते रवींद्र मिर्लेकर, रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

वरणगावात शिवसेनेची वाढणार
भाजपचे सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ यांचा मुस्लिम समाजात दबदबा असून त्यांच्यामागेदेखील मुस्लिम समाजातील तरुण आहे. शिवाय सेनेत प्रवेश केलेले संतोष माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरणगाव शहराचे माजी शहराध्यक्ष असून त्यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्ष असताना वरणगावात राष्ट्रवादी वाढवण्याचे काम केले होते. माळी समाजातील तरुण देखील त्यांच्या पाठीशी आहेत.नगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी हिप्पीशेठ आणि संतोष माळी यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात शहरात आणखी शिवसेनेची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



यांनी केला शिवसेनेत प्रवेश
मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पीशेठ, वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संतोष बळीराम माळी, मारूळ, ता.यावल येथील ग्रामपंचायत सदस्य सय्यद नदीम अक्तर युनूसअली, सय्यद शकील सय्यववली, इंजि.सय्यद मुजाहिद, अबू सुफियान, मुदस्सर खान, अरबाज पैलवान, अजीमखन असारखान, जहिर पठाण यांनी शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन बांधले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !