एस.टी.कर्मचार्‍यांना ऐतिहासीक पगारवाढ मात्र संपकर्‍यांशी चर्चेनंतर उद्या निर्णय होणार जाहीर

गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांची माध्यमांना माहिती


मुंबई : तब्बल 16 दिवसांपासून एस.टी.कर्मचार्‍यांचा संप कायम असून घसघसीत पगारवाढीनंतरही कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे विलीनीकरणाबाबत हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा रीपोर्ट आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन परीरवहन मंत्री अनिल परब यांनी दिले मात्र कर्मचार्‍यांनी आपली मागणी कायम ठेवली आहे. दरम्यान, आंदोलनाचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर जात कर्मचार्‍यांशी संवाद साधला. उभय पदाधिकारी म्हणाले की. सरकारसोबत बुधवारी आमची बैठक झाली. परंतु कर्मचार्‍यांसोबत रात्रभर चर्चा करू. आजचा मुक्काम आझाद मैदानात करू उद्या संपावर निर्णय घेतला जाईल.

उद्या संपाबाबत निर्णय होण्याची शक्यता
सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला. आझाद मैदानात कर्मचार्‍यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू, अशी भूमिका पडळकर व खोत यांनी मांडली आहे. कुठल्याही कर्मचार्‍यांनी वेगळं मत मांडू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घ्यायचा आहे. सकाळी एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ठाकरे सरकारने एसटी कर्मचार्‍यांची फसवणूक केली असून पगारवाढीला आमची मान्यता नाही. 42 कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्या तरी सरकार कर्मचार्‍यांची फसवणूक करत आहे. पगारवाढीच्या बातम्या आल्यानंतरही कर्मचार्‍यांची नाराजी पसरली असल्याचं चित्र आझाद मैदानात पाहायला मिळाले.



एस.टी.कर्मचार्‍यांच्या वेतना ऐतीहासीक पगारवाढ
संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचार्‍यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात ही वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कर्मचार्‍यांना 7 हजार 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 41 टक्क्यांनी ही वाढ देण्यात आली आहे. एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ मानली जात आहे. 1 ते 10 वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचार्‍यांच्या पगारात 5 हजारांची वाढ झाली आहे. 10 ते 20 वर्षाच्या सेवा बजावणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारात 4 हजार पगारवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !