इलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागल्याने बोदवडला युवकाचा मृत्यू


बोदवड : शहरातील उर्दू शाळेजवळील माळी गल्लीतील 22 वर्षीय युवकाचा मोटारीचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला. अतुल राजू माळी (22) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता मयताच्या राहत्या घरी घडली. घराच्या ओसरीत इलेक्ट्रीक मोटरने पाणी भरत असताना मोटारीत वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का अतुल माळी या युवकास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिनेश भास्कर माळी यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास संदीप वानखेडे करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात वृद्ध आजी, आई, भाऊ व विवाहित बहिण असा परीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !