भुसावळात राष्ट्रीय ओबीसी मोर्चातर्फे जेलभरो आंदोलन


भुसावळ : ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, शेतकर्‍यांवर लादलेले काळे कायदे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मागे घेण्यात यावे, इलेक्ट्रॉनिक्स मतदार मशीन बंद करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चातर्फे गुरूवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणा देत मागण्या मांडल्यात. पोलिसांनी 11 आंदोलनाकांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली. यावेळी भुसावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी आंदोलन करीत सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी खान्देश प्रभारी सुधाकर बडगुजर, कल्पना म्हस्के, नंदा बाळकृष्ण सोनवणे, बाळकृष्ण सोनवणे, विजय साळवे, प्रमोद उंबरकर, पलक म्हस्के, आशा तायडे, चंद्रभान जाधव, सिंधूबाई जाधव आदी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रमोद पाटील, राजेश बोदडे व पोलिस कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !